प्रबोधनकार ठाकरे - लेख सूची

हिंदूच्या देवळांची उत्पत्ती

हिंदूच्या देवळांची उत्पत्ती इसवी सनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकापर्यंत हिंदुजनांत व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्धधर्माचा पाडाव करून भटी वर्चस्वस्थापनेसाठी महाभारताच्या व रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. मात्र त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला, बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या आमदनीपासून बौद्ध …